पंढरपूर येथे कसे जायचे
पंढरपूर येथे कसे जायचे
पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दर्शनासाठी भारतभरातून रेल्वे व बसमार्गाने सहज पोहोचता येते.
अधिक माहितीसाठी कृपया विठ्ठल-रुखुमाईची कथा पाहा.
रेल्वेने प्रवास
पंढरपूरला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे, जे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक शहरांशी जोडलेले आहे.
- पुणे – पंढरपूर अंतर सुमारे 230 किमी
- मुंबई – थेट किंवा कनेक्टिंग ट्रेन उपलब्ध
- कोल्हापूर, मिरज, नागपूर येथून ट्रेन उपलब्ध
- कुर्डुवाडी हे मोठे जंक्शन पंढरपूरपासून 50 किमी आहे
कुर्डुवाडीहून बस किंवा टॅक्सीने पंढरपूरला जाता येते.
तुम्हाला अद्ययावत रेल्वे वेळापत्रक India Rail Info येथे मिळेल.
रस्त्याने प्रवास
- पुणे ते पंढरपूर – सुमारे 220–230 किमी (5–6 तास)
- सोलापूर ते पंढरपूर – 75 किमी
- खासगी वाहनाने प्रवास सोयीस्कर
रस्ते चांगले असल्यामुळे अनेक भाविक कारने प्रवास करतात.
जवळचे विमानतळ
सर्वात जवळचा विमानतळ – पुणे
पुण्याहून बस, ट्रेन किंवा कारने पंढरपूरला जाता येते.
इतर राज्यांमधून प्रवास
कर्नाटक आणि दक्षिण भारतातूनही अनेक भाविक येतात.
- बेळगाव, हुबळी, बेंगळुरू येथून ट्रेन/बस उपलब्ध
- काहीजण आधी सोलापूरला येऊन तिथून पंढरपूरला जातात
महत्वाच्या टिप्स
- आषाढी व कार्तिकी एकादशीला गर्दी खूप असते – तिकीट आधी बुक करा
- पहाटे दर्शनासाठी लवकर पोहोचा
- कुर्डुवाडीमार्गे कनेक्टिंग ट्रेनचा पर्याय सोयीस्कर
